सहाय्यक मुल्य निर्धारक तथा कर संकलन विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : श्री. विनायक गंगाधर जोशी
पदनाम : प्र.सहायक कर निर्धारक व संग्राहक
ई – मेल : vinayak.joshi28@mah.gov.in
मोबाईल क्रं. : 9822076865

प्रस्‍तावना

१.  शहरातील इमारतीवरील संकलीत कर वसुली करणे.

२. अर्थिक वर्षात अहिल्यानगर महानगरपालिका हद्यीत नव्याने तयार झालेले इमारतीवर झोन निहाय निश्चित करण्यात आलेल्या दराप्रमाणे संकलीत कराची आकारणी करणे.

३. संकलीत कर आकारणी करणे बाबत आलेल्या तक्रारी समक्ष पहाणी करुन अधिनियमातील तरतुदीनुसार तक्रारीचा निपटारा करणे..

४. संकलीत कर इतर तदनुषंगिक कराच्या अद्यावत नोंदवही ठेवणे

५. माहिती अधिकारांतर्गत आलेल्या प्रभाग समिती कार्यालय क्र १,२,३,४ मधील नागरीकांचा तक्रार अर्जावरील माहिती संकलन करुन देणे.

६. म.न.पा हद्यीतील मंजुर रेखांकनान्च्या मोकळया भुखंडावर अकारणी करुन नविन मिळकतीच्या नोंदी कर आकारणी रजिष्टर करणे व संगणाकावर नोंद घेणे.

७. प्रभाग समिती कार्यालय क्र १,२,३,४ कडील नविन कर आकारणी कर आकारणी प्रकमरणे सहाय्यक मुल्या निर्धारक अधिकारी मार्फत मा. उपायुक्त कर यांच्याकडे सादर करणे.

८ . मा. जिल्हा न्यायालय, मा. उच्च न्यायालय मध्ये प्रलंबित प्रकारणाबाबत माहिती सादर करणे.

९. माहिती अधिकारी, लोकशाही दिनांमध्ये प्राप्त होणारी प्रकरणे, शासकीय कार्यालया कडील पत्र व्यवहार, अंदाज पत्रक तयार करणे.

१०. मा. स्थायी समिती व मा. महासभेकडे प्रस्ताव सादर करणे.

११. मालमत्ता हस्तांतरणाची योग्य ती फी भरुन सदरचे प्रकरण छाननी करुन संगणकावर टाकणे.