माहिती सुविधा केंद्र

विभाग प्रमुखाचे नाव : सुरेखा मुरलीधर सुरसे
पदनाम : प्रभारी विभाग प्रमुख
ई – मेल : surekhasurse@gmail.com
मोबाईल क्रं. : 9960586130

प्रस्‍तावना

महानगरपालिकेतील विविध विभांगामधील सेवा माहिती व सुविधा केंद्रामार्फत दिल्या जातात. जन्म दाखला, मृत्यु दाखला, जन्म रजिस्टरमध्ये नावाची नोंद, मालमत्ता हस्तांतरण, परिशिष्ठ अ, सांडपाणी पुर्णत्व प्रमाणपत्र, ठराव नक्कल, परवाना नुतनीकरण, अग्निशमन परवाना व नुतनीकरण, मांडव भाडे इत्यादी कामासाठी नागरिकांकडून आलेले अर्ज दाखल करुन घेणे, ठरलेली फी भरुन घेणे, दररोज आलेला भरणा लेखापरिक्षण करुन घेऊन अर्थ विभागाकडे जमा करणे, आलेले अर्ज दररोज संबंधित विभागाकडे पाठविणे व संबंधित विभागाकडून आलेले दाखले नागरिकांना अदा करणे. नागरिक व महानगरपालिकेतील इतर विभाग यामध्ये दुवा साधण्याचे काम करणे. नागरिकांचे तक्रार निराकरण करणे.