घनकचरा व्यवस्थापन विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : श्री.अशोक दत्तात्रय साबळे
पदनाम : सहायक आयुक्त
ई – मेल : ashok.sabale71@mah.gov.in
मोबाईल क्रं. : 9699298854

प्रस्‍तावना

अहिल्यानगर महानगरपालिकेची स्थापना २००३ साली झाली. हे शहर चार प्रभागांमध्ये विभागले असून, त्यात एकूण १७ वॉर्ड आहेत. शहराचे क्षेत्रफळ सुमारे ८४ चौ. किमी असून, २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,५०,८५९ होती. सध्या ही लोकसंख्या अंदाजे ४ लाखांवर असून, दररोज सुमारे २० हजार वाहती लोकसंख्या येथे येते.

खालील तक्त्यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन यंत्रणेचा तपशील दिला आहे:

घटक
तपशील
दररोज निर्माण होणारा कचरा
१४० ते १५० मेट्रिक टन
कचरा संकलनासाठी वापरली जाणारी वाहने८० घंटागाड्या (मनपा व ठेकेदार), ११ कॉम्पॅक्टर
कॉम्पॅक्टर खरेदी (स्वच्छ भारत अभियान १.० अंतर्गत)
७ कॉम्पॅक्टर
घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे स्थानबुरुडगाव (शहरापासून १० किमी अंतरावर)
ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प
१०० TPD व ५० TPD क्षमतेचे दोन प्रकल्प
बायोमिथेनायझेशन प्रकल्प
१० TPD क्षमतेचा प्रकल्प
सुका कचरा प्रक्रिया केंद्र (MRF)
६० TPD क्षमतेचे MRF सेंटर
जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प
४ TPD क्षमतेचा प्रकल्प
प्राणिजन्य कच-यासाठी प्रकल्प
अॅनिमल इनसिनरेटर प्रकल्प

 जल व मलनिस्सारण सेवाः

अमृत योजनेअंतर्गत शहरात १००% शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो.

विळद घाट येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो.

फरीयाबाग येथे ५७ MLD क्षमतेचे मलजल शुद्धीकरण केंद्र (STP) उभारण्यात आले आहे.

२० KLD क्षमतेचा FSTP प्रकल्प देखील कार्यान्वित आहे.

शहरात तीन मलवाहक गाड्यांद्वारे मलवाहन व्यवस्थापन केले जाते.

प्रमुख कामगिरी व सन्मानः

स्वच्छ सर्वेक्षणः

२०२० प्रमाणपत्र देशात ४० वा क्रमांक, ३ स्टार कचरामुक्त शहर, ODF++

२०२१ – देशात २२ वा क्रमांक, ३ स्टार कचरामुक्त शहर, ODF++

२०२२ – देशात २८ वा क्रमांक, ३ स्टार कचरामुक्त शहर, ODF++

०२०२३ ३ लाखांहून अधिक लोकसंख्येच्या गटात देशात २९ वा

क्रमांक, ३ स्टार कचरामुक्त शहर, ODF++

माझी वसुंधरा अभियानः

२.० – राज्यात तिसऱ्या क्रमांकाची उच्च उडी बक्षीस

३.० व ४.० राज्यात दुसरे क्रमांक

शहर व वॉर्ड सौंदर्याकरण स्पर्धाः तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक

अहिल्यानगर महानगरपालिका हे शहरस्वच्छ, हरित व सुंदरबनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. विविध शासकीय योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मनपा कटिबद्ध आहे.