पाणी पुरवठा विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : परिमल जगन्नाथ निकम
पदनाम : जल अभियंता
ई – मेल : amc.water@gmail.com
मोबाईल क्रं. : 9561004656

प्रस्‍तावना

  • अहिल्‍यानगर महानगरपालिका, शहर पाणी पुरवठा योजनेचे अहिल्‍यानगर शहरा पासून सुमारे 32.00 किलो मीटर अंतरावर मुळाधरण ज्ञानेश्‍वर जलाशय येथे उदभव केंद्र आहे मुळाधरण येथे पाणी योजने करिताचे जॅकवेल व पंपीग स्‍टेशन आहे.
  • मुळानगर पंपीग स्‍टेशन येथे 725 अश्‍वशक्‍तीचे 03 मोटार / पंपसेट व 400 अश्‍वशक्‍तीचे 03 मोटार / पंपसेट कार्यरत आहे.
  • मुळानगर येथील पंपगृहातून मोटारी द्वारे उचलेले अशुध्‍द पाणी वेगवेगळया जलवाहिन्‍यां द्वारे तेथून जवळच उंचीवर असलेल्‍या बी पी टी (संतुलित टाकी) मध्‍ये व तेथून 700 एम एम (सी आय) 01 जलवाहिनी व 1100 एम एम (PSC) च्‍या 02 जलवाहिन्‍यां या प्रमाणे एकूण 03 जलवाहिन्‍यां द्वारे विळद जलशुध्‍दीकरण केंद्र येथे आणले जाते.
  • विळद जलशुध्‍दीकरण केंद्र येथे अनुक्रमे 16, 22, 35 व 45 MLD प्रतिदिन क्षमतेचे जलशुध्‍दीकरण प्रकल्‍प कार्यान्वित आहेत.मुळानगर येथून आणलेले अशुध्‍द पाणी या जलशुध्‍दीकरण प्रकल्‍पाद्वारे त्‍यावर नैसर्गिक, तांत्रिक व रायायनिक प्रक्रिया करून शुध्‍द केले जाते.
  • विळद जलशुध्‍दीकरण केंद्र येथे शुध्‍द केलेले पाणी विळद येथील एकूण 03 पंपगृहातील कार्यरत 300 अश्‍वशक्‍ती, 400 अश्‍वशक्‍ती व 600 अश्‍वशक्‍तीच्‍या वेगवेगळया मोटार/ पंपसेट द्वारे उचलून 600 एम एम डी आय, 800 एम एम एम एस व 1000 एम एम एम एस व्‍यासाच्‍या 03 मुख्‍य जलवाहिन्‍यां द्वारे वसंतटेकडी वितरणासाठी आणले जाते.
  • पाणी पुरवठा केंद्र वसंतटेकडी येथे 68 लक्ष लिटर्स व 50 लक्ष लिटर्सच्‍या 02 मुख्‍य संतुलन टाक्‍या कार्यान्वित आहेत. या टाक्‍यांमध्‍ये विळद येथून उपलब्‍ध होणारे शुध्‍द पाण्‍याचे दैंनदिन पाणी वाटपाचे नियोजन करून शहराच्‍या मध्‍यवर्ती भागासह विस्‍तारीत सर्व उपनगर भागास टप्‍याटप्‍याने पाणी वाटप करण्‍यात येते.