प्रभाग समिती क्र.1

विभाग प्रमुखाचे नाव : श्री. बबन लक्ष्मण काळे
पदनाम : प्रभारी प्रभाग अधिकारी
ई – मेल : kalebabanrao9@gmail.com
मोबाईल क्रं. : 7720005559

प्रस्‍तावना

अहिल्यानगर महानगरपालिका हददीतील प्रभाग समिती क्र.1 या विभागाकडे प्रभागाअंतर्गत खालीलप्रमाणे कामकाज करण्यात येते

1. सावेडी प्रभाग समिती क्र.1 कार्यालय – सदर सावेडी उपविभागीय कार्यालयाकडुन प्रभाग समिती क्र. 1 अंतर्गत येणारे संपूर्ण विभागांवर देखरेख व नियंत्रण करण्याचे व कार्यालयीन पत्रव्यवहार व नागरिकांचे प्राप्त तक्रारीनुसार कार्यवाही करण्याचे तदअनुषंगिक कामकाज करण्यात येते

2. सावेडी व नागापुर वसुली विभाग -या दोन्ही विभागामार्फत घरपटटी वसुली बिले वाटप व घरपटटी वसुलीबाबतचे संपुर्ण कामकाज करण्यात येऊन घरपटटी बाबत नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येते

3. सावेडी आरोग्य (सावेडी घनकचरा विभाग) याविभागामार्फत सावेडी प्रभाग समिती क्र. 1 अंतर्गत येणा-या सावेडी व नागापुर भागातील साफसफाई, स्वच्छता बाबतचे व नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार कार्यवाही करण्याबाबतचे संपुर्ण कामकाज करण्यात येते

4 सावेडी जन्म मृत्यु विभाग-सावेडी जन्म मृत्यु विभागाकडे सावेडी व नागापुर भागातील नागरिकांचे जन्म मृत्यु दाखले देणे याबाबत तदअनुषंगिक संपुर्ण कामकाज करण्यात येते.

5. सावेडी अतिक्रमण विभाग या विभागामार्फत सावेडी व नागापुर भागातील नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार अतिक्रमण हटविणेबाबतचे संपुर्ण कामकाज करण्यात येते.

6. सावेडी व नागापुर पाणीपुरवठा विभाग – या विभागामार्फत सावेडी व नागापुर विभागामधील नागरिकांच्या मागणी अर्जानुसार नविन नळ कनेक्शन, नळ दुरुस्ती बाबत तदअनुषंगिक संपूर्ण कामकाज करण्यात येते

7. सावेडी इलेक्ट्रीक विभाग -या विभागामार्फत सावेडी व नागापुर भागातील स्ट्रीट ट्युब लाईट देखभाल व दुरुस्तीचे संपुर्ण कामकाज करण्यात येते

8. सी.एफ.सी.सेंटरया विभागामार्फत नागरिकांचे घरपटटी संगणकीय पावत्या करणे व जन्म मृत्यु दाखले मिळणेबाबत शासकीय रक्कम भरलेबाबतची पावत्या करणेचे कामकाज करण्यात येते.

याप्रमाणे सावेडी प्रभाग समिती क्र.1 चे कार्यालयीन कामकाज करण्यात येते.