आस्थापना विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : श्री. मेहेर गंगाधर लहारे
पदनाम : सहाय्यक आयुक्त
ई – मेल : meher.lahare84@mah.gov.in
मोबाईल क्रं. : 8379897111

प्रस्‍तावना

महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून महानगरपालिका ह‌द्दीत मुलभुत व पायाभुत सेवा सुविधा पुरविणे हे प्रामुख्याने कार्य चालते. तसेच इतरही सामाजिक विषयासंदर्भात कामकाज चालते. सदर कार्यासाठी कुशल, तांत्रिक इत्यादी ज्ञान अवगत असणारे मनुष्यबळ आवश्यक असते. आस्थापना विभागामार्फत सदर बाबत विभागाची रचना करणे, विभागा अंतर्गत आवश्यक कर्मचारी संख्या, शैक्षणिक अर्हता निश्चीती, याबाबतचा आराखडा तयार करणे, अद्ययावत करणे, सदर पदांवर शासनाच्या निर्देशानुसार व सेवाप्रवेश नियमाच्या आधारे भरती करणे याबाबत प्रामुख्याने कामकाज केले जाते.

सदर भरती केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचेबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1979 / 1981 अंतर्गत प्रामुख्याने कार्यवाही, कारवाई केली जाते.

अहिल्यानगर महानगरपालिकेचे सुधारीत सेवाप्रवेश नियम व आकृतीबंधास मा. शासनाने दि.6 फेब्रुवारी, 2016 मंजुरी दिलेली आहे. सदर सेवाप्रवेश नियम व आकृतीबंधनुसार महानगरपालिकेतील पदांवर भरती केली जाते. त्याचप्रमाणे मा. शासनाच्या विविध योजना अंतर्गत देखील भरती केली जाते. (शिकाऊ उमेदवारी योजना / मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, इत्यादी)

महानगरपालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन, भत्ते, रजा, सेवानिवृती, प्रशिक्षण, शिस्त व अपील इत्यादी बाबतची नियमित कार्यवाही मा. शासन तरतुदीनुसार, अधिनियम, मा. न्यायालय यांचे आदेशानुसार केली जाते.

कार्यालयीन रचना