सामान्य प्रशासन विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : श्री. मेहेर गंगाधर लहारे
पदनाम : सहाय्यक आयुक्त
ई – मेल : amc_anr@rediffimail.com
मोबाईल क्रं. : 8379897111

प्रस्‍तावना

सामान्य प्रशासन विभागामार्फत विविध प्रकारच्या शासकीय बैठकी बाबतची माहिती तसेच मा. शासनाने मागविलेली माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त करून घेवून मा. शासनास, तसेच आवश्यकतेनुसार मा. संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मा. विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठविणे.

सामान्य प्रशासन विभागाचे अखत्यारितील प्रस्ताव ठेवणे, सर्व प्रकारचे कार्यालयीन पत्रव्यवहार शासकीय पत्र व्यवहार, कार्यालयीन आदेश, इतिवृत्त, माहिती अधिकार मध्ये प्राप्त झालेल्या अर्जाना उत्तरे पाठविणे व इतर तद्नुषंगिक पत्रव्यवहार,

लोकशाही दिन :- सामान्य प्रशासना विभागामार्फत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महानगरपालिका स्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. लोकशाही दिनामध्ये तक्रारदार यांचेकडुन प्राप्त झालेल्या तक्रारी पुढील कार्यवाही करीता संबंधित विभागाकडेस पाठविणे, तसेच लोकशाही दिनाचे इलर तद‌नुषंगीक स्वरूपाचे कामकाज

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम : सामान्य प्रशासन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार एकुण 67 लोकसेवा अधिसुचित केलेल्या आहेत. सदरील 67 लोकसेवा संबंधित विभागांकडून नागरिकांना विहित कालमर्यादे मध्ये पुरविण्यात येतात. सदरील लोकसेवा नागरिकांना ऑनलाईन स्वरुपात प्रदान करणेबाबत कार्यवाही सुरु आहे.

मुख्यमंत्री सचिवालय कक्ष : मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडुन पाप्त झालेली नागरिकांचे तक्रार अर्ज/पत्रे संबंधित विभागांना कार्यवाही करीता पाठविण्यात येते, त्याबाबत संबंधित विभागांना वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येतो. संबंधित विभागांकडून लवकरात लवकर तक्रारी निकाली काढणेबाबत कार्यवाही केली जाते.

आपले सरकार: आपले सरकार पोर्टल वरून प्राप्त झालेली नागरिकांचे तक्रार अर्ज/पत्रे संबंधित विभागांना कार्यवाही करीता पाठविण्यात येते, त्याबाबत संबंधित विभागांना वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येतो. संबंधित विभागांकडून लवकरात लवकर तक्रारी निकाली काढणेबाबत कार्यवाही केली जाते.

PG पोर्टल: PG पोर्टल वरून प्राप्त झालेली नागरिकांचे तक्रार अर्ज/पत्रे संबंधित विआगांना कार्यवाही करीता पाठविण्यात येते, त्याबाबत संबंधित विभागांना वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येतो. संबंधित विभागांकडून लवकरात लवकर तक्रारी निकाली काढणेबाबत कार्यवाही केली जाते.

मा. शासनाकडून प्राप्त होणारे तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, विधानसभा ठराव, आश्वासने, मा.लोक आयुक्त / मा.उप लौक आयुक्त यांचेकडुन प्राप्त झालेले संदर्भ, विविध स्वरुपाचा पत्रव्यवहार, परिपत्रके, आदेश इ. संबंधित विभागांकडे पाठविणे त्याच्या नोंदवह्या ठेवून अद्रद्ययावत करणे, मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडील संदर्भ इत्यादीच्या नोंदवह्या ठेवुन अद्ययावत करणे तसेच नागरिकांनी मागणी केल्यास त्यांना अहमदनगर शहराच्या एकुण लोकसंख्येचा तसेच प्रभागनिहाय लोकसंख्येचा दाखला देणे मोबाईल व लॅण्डलाईन दुरध्वनीची बौले तयार करणे व वसुलीसाठी अर्थ विभागाकडे पाठविणे व मोबाईल संबंधि इतर तद्‌नुषंगिक कामे. अहिल्यानगर महानगरपालिकेत येणारे सर्व प्रकारचे आवक टपाल स्वीकारणे, मा. वरिष्ठांची स्वाक्षरी घेवून संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी पाठविणे, जावक टपाल नोंद घेवून सर्व संबंधितांना पाठविणे, आउट डोजर टपाल वाटप करणे पोस्टल रिक्रूपमेंटचे काम करणे, याशिवाय मा. वरिष्ठांनी सोपविलेले कार्यालयीन कामकाज व इतर तद्‌नुषंगिक कार्यालयीन कामकाज