प्रकल्प विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : श्री.गणेश काशीनाथ गाडळकर
पदनाम : उप अभियंता
ई – मेल : amc.project4@gmail.com
मोबाईल क्रं. : 9561004642

प्रस्‍तावना

महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असुन महानगरपालिका हद्दीत मुलभूत व पायाभूत सेवा सुविधा पुरविण्याचे कार्य करते. प्रकल्प विभागामार्फत महानगरपालिका हद्दीमध्ये राहण्या-या नागरीकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना या योजनांची अंमलबजावणी केली जाते.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (BLC) मनपा हद्दीमध्ये ज्यांची स्वतःची जागा आहे अशा पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रु.२.५० लक्ष इतके अनुदान टप्याटप्याने देण्यात येते.

रमाई आवास योजना ही प्रामुख्याने अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबवली जाते. रमाई आवास योजने अंतर्गत मनपा हद्दीमध्ये ज्यांची स्वतःची जागा आहे अशा पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रु.२.५० लक्ष इतके अनुदान टप्याटप्याने देण्यात येते.

या घरकुल योजनांव्यतिरिक्त प्रकल्प विभागाअंर्तगत खालील प्रमाणे प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

१)सावेडी सि.स.नं. १२९ (पैकी) प्रोफेसर कॉलनी चौक येथे सध्या अस्तित्वात असलेले जुने शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागी नव्याने वाहनतळ व्यवस्थेसह कमर्शिअल कॉम्प्लेक्स विकसित करणे.

२) नेहरू मार्केट सि.स.नं. २०८ या ठिकाणी भाजी मंडईसह व्यापारी संकुल विकसित करणे.

३) अहिल्यानगर मनपाच्या मालकीच्या सिटी सर्व्हे नं.६४६६,७५४७, ७१८९ (सर्जेपुरा रंगभवन) या ठिकाणी नाट्यगृह, पार्किंग व शॉपिंग कॉम्प्लेक्स विकसित करणे

४) सावेडी स.नं.२/१८/२,२/१ क/२ व २/१ड/२/२, परीचय हॉटेल शेजारील जागेत विशेष प्रकल्प राबविणे.

५) सावेडी गट क्र. २२८/१, २२८/३अ, २२८/३ अ पै, २२९/१ ब/२ व २२९/१ब/२अ येथील

महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावर नोकरदार/कार्यरत महिलांकरीता वसतिगृह बांधणे.

Sr.No.Name
1केंद्र शासन माहितीचा अधिकार २००५ चे कलम ४(१) (ख) नुसार माहिती
2आयएचएसडीपी फेज 1 व फेज 2 लाभार्थ्‍यांची यादी
3महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० राबविण्यात येत आहे
4जाहीर आवाहन - अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रातील दारिद्र रेषेवरील इच्छूक नागरिकांना सदर योजनेचा लाभ घेणेबाबत.
5Third Party Quality Monitoring Report of BLC
Projects under PMAY-170/233

6नालेगांव सं.नं.41/1, 43/3 येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील सोडती मधील लाभार्थीची यादी
7केडगाव सं.नं. 206/1अ येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील सोडती मधील लाभार्थीची यादी
8भागीदारी तत्‍वावर परवडणारी (AHP )
9वैयक्तिक घरकुल बांधण्‍याचे प्रकल्‍प (BLC)
10कर्ज संलग्‍न अनुदानाच्‍या माध्‍यमातुन (CLS)