भांडार विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : अशोक गंगाधर जाधव
पदनाम : प्र. भांडार विभाग प्रमुख
ई – मेल : ashok.jadhav27@mah.gov.in
मोबाईल क्रं. : 9422084921

प्रस्‍तावना

> अहिल्यानगर महानगरपालिका सर्व विभागाकडील मागणी प्रस्तावान्वये माल साहित्य तसेच सर्व दवाखाने व रक्तपेढी करिता औषधे, रसायने, वैदयकिय साहित्य व उपकरणे नियमानुसार खरेदी प्रक्रिया करून पुरवठा करणे.

> पुरवठादार यांची बीले लेखापरिक्षण करून सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेवून अर्थ विभागात दाखल करणे.

> गणवेषपात्र स्त्री व पुरुष कर्मचा-यांसाठी गणवेष, रेनसुट/रेनकोट नियमानुसार खरेदी प्रक्रिया करुन वाटप करणे.

> अहिल्यानगर महानगरपालिका सर्व विभागाकडील मंजूरी प्रस्तावानुसार जुने निरुपयोगी भंगार साहित्याची विक्री प्रक्रिया करुन येणारी रक्कम अर्थ विभागात जमा करणे.

> केंद्र शासन माहितीचा अधिकार 2005 नुसार प्राप्त अर्जानुसार अर्जदार यांना त्यांनी अपेक्षिलेली माहिती जन माहिती अधिकारी म्हणून पुरविणे.

> मा.आयुक्त, मा. उपायुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कार्यालयीन कामे करणे.

अहिल्यानगर महानगरपालिकेतील भांडार विभाग कार्यालयातील वरीलप्रमाणे कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने कार्यरत कर्मचा-यांकडून कार्यालयीन कामे करुन घेणे व सर्व कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे.