प्रभाग समिती क्र.4

विभाग प्रमुखाचे नाव : श्री.शहाजान बुरान तडवी
पदनाम : प्र.प्रभाग अधिकारी
ई – मेल : s.tadvi74@mah.gov.in
मोबाईल क्रं. : 9561004640

प्रस्‍तावना

अहिल्यानगर महानगरपालिका ह‌द्दीतील प्रभाग समिती क्र. 4 अंतर्गत खालील प्रमाणे कामकाजा करण्यात येते.

प्रभाग समिती क्र. 4 कार्यालय अंतर्गत येणारे संपुर्ण विभागांवर देखरेख व नियंत्रण करण्याचे व कार्यालयीन पत्रव्यवहार व नागरीकांचे प्राप्त तक्रारीनुसार कार्यवाही करण्याचे तद्नुषंगिक कामकाज करण्यात येते.

१) शहर वसुली विभाग विभागामार्फत नविन झालेल्या मालमतेस नविन कर आकारणी करणे, मालमता वापरात बदल झाल्यास त्याबाबतच्या नोंदी घेणे, मालमत्ता कर (पाणीपट्टी व घरपट्टी) भरुन घेणे, मालमता कर बिले वाटप करणे व मालमत्ता करा बाबतचे संपुर्ण कामकाज करण्यात येऊन मालमत्ता करा बाबत नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करणे.

२) शहर घनकचरा विभाग या विभागामार्फत प्रभाग समिती क्र. 4 अंतर्गत येणा-या भागातील साफ-सफाई, स्वच्छता बाबतचे व नागरीकांच्या प्राप्त तक्रारीनुसार कार्यवाही करण्या बाबतचे संपुर्ण कामकाज करण्यात येते.

3) जन्म-मृत्यू विभाग प्रभाग अंतर्गत येणा-या भागातील नागरिकांचे जन्म व मृत्यू दाखले देणे या बाबत तद्नुषंगीक संपुर्ण कामकाज करण्यात येते.

४) शहर अनाधिकृत बांधकाम नियंत्रण व अतिक्रमण निर्मूलन विभाग या विभागामार्फत शहर भागातील नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार अनाधिकृत बांधकाम नियंत्रण व अतिक्रमण निर्मूलन बाबतचे संपुर्ण कामकाज करण्यात येते.

५) शहर पाणी पुरवठा विभाग या विभागामार्फत शहर भागातील नागरीकांच्या मागणी अर्जानुसार नविन नळ कनेक्शन देणे, नळ दुरुस्ती व नळ बंद करणे बाबतचे कामकाज करण्यात येते. याप्रमाणे शहर प्रभाग समिती क्र. 4 चे कार्यालयीन कामकाज करण्यात येते.