शिक्षण विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : श्री जुबेर नुरमोहंमद पठाण
पदनाम : प्रशासन अधिकारी
ई – मेल : juber.pathan87@mheauth.nic.in
मोबाईल क्रं. : 9422342083

प्रस्‍तावना

अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभागा अंतर्गत महानगरपालिकेच्या 11 शाळा चालविण्यात येत असून सदर शाळांमध्ये सर्व विदयार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. शहरातील सर्व घटकांतील विदयार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देणे तसेच शहरातील विदयार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविणे समग्र शिक्षा अंतर्गत शाळांना इयता। ली ते 8 वी इयत्तेसाठी मोफत पाठ्यपुस्तक इत्यादी सुविधा पुरविणे, शाळेत प्रवेश मिळवून देणे, शाळा बाहय विदयार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शालेय प्रवाहात सामिल करणे.आर.टी.ई.25 टक्के अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विदयार्थ्यांना विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देणे. शासना मार्फत राबविण्यांत येणा-या विविध उपक्रमांची प्राथमिक शाळांमध्ये अंमलबजावणी करणे, शहरातील विशेष गरजा असणा-या सर्व शाळेतील विदयार्थ्यांना विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करुन संदर्भ सेवा व साहित्य साधने उपलब्ध करुन देण्यांत येते.