नगरसचिव विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : श्री. मेहेर गंगाधर लहारे
पदनाम : सहाय्यक आयुक्त
ई – मेल : meher.lahare84@mah.gov.in
मोबाईल क्रं. : 8379897111

प्रस्‍तावना

मा.महापौर निवड, मा. उपमहापौर निवड, मा. स्थायी समितीचे १६ सदस्य निवड, मा. स्थायी समिती सभापती निवड, महिला व बालकल्याण समिती १६ सदस्य निवड, ५ नामनिर्देशित सदस्याची निवड करणे, मा. महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती निवड करणे, इत्यादी निवडणुका मा. महासभेतून व मा. विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी यांचे मार्फत घेण्यांत येतात.

मा.सर्वसाधारण सभा, मा. स्थायी समिती सभा, मा. महिला व बालकल्याण समिती सभेचे आयोजन करणे, स्थायी समितीचे तयार झालेले ठरावाचे मसुदे तपासणे, मा. महासभा व स्थायी समिती सभेमध्ये घ्यावयाच्या विषयांची यादी, दिनांक, वेळ इत्यादी बाबत आदेश मा. प्रशासक यांचेकडुन घेणे. सभेमध्ये इ गालेल्या चर्चे नुसार ठराव टाईप करून संपूर्ण प्रकरणासह ठराव संबंधित विभागाकडे पाठविणे. सदरचे कामकाज नगरसचिव यांचेमार्फत करण्यांत येते.