प्रभाग समिती क्र.3

विभाग प्रमुखाचे नाव : श्री. शाम गोडळकर
पदनाम : प्रभारी प्रभाग अधिकारी
ई – मेल : sham godalkar@gmail.com
मोबाईल क्रं. : 8788213270

प्रस्‍तावना

प्रभाग समिती क्रमांक ३ झेंडीगेट विभागामार्फत विविध प्रकारच्या शासकीय बैठकी बाबतची माहिती तसेच मा. आयुक्त यांनी मागविलेली माहिती प्रभाग समिती अंतर्गत संबंधित विभागांकडून प्राप्त करून घेवून मा. आयुक्त साहेब. मा. उपायुक्त साहेब अथवा सामान्य प्रशासन विभाग येथे पाठविणे.

सर्व प्रकारचे कार्यालयीन पत्रव्यवहार / शासकीय पत्र व्यवहार, कार्यालयीन आदेश, इतिवृत्त, माहिती अधिकार मध्ये प्राप्त झालेल्या अर्जाना उत्तरे पाठविणे व इतर तदनुषंगगिक पत्रव्यवहार.

लोकशाही दिन – सामान्य प्रशासन विभागामार्फत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महानगरपालिका स्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते लोकशाही दिनामध्ये तक्रारदार यांचे कडुन प्राप्त झालेल्या तक्रारीची शहरातील करून स्थळ पहाणी करून पुढील कार्यवाहीप्रस्तावीत करण्यात येते. तसेच लोकशाही दिनाचे इतर तदनुषंगीक स्वरूपात कामकाज

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम- सामान्य प्रशासन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार एकुण ६७ लोकसेवा अधिसुचित केलेल्या आहेत. सदरील ६७ लोकसेवा संबंधीत विभागावाकडून नागरिकांना विहित कालमर्यादे मध्ये पुरविण्यात येतात. सदरील लोकसेवा नागरिकांना ऑनलाईन स्वरूपात प्रदान करणेबाबत कार्यवाही सुरू आहे.
मुख्यमंत्री सचिवालय कक्ष-मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडून प्राप्त झालेली नागरिकांचे तक्रार अर्ज / पत्रे संबंधीत प्रभाग अंतर्गत येणा-या विभागांना कार्यवाही करीता पाठविण्यात येते त्याबाबत संबंधीत विभागांना वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येतो. संबंधीत विभागांनकडून लवकरात लवकार तक्रारी निकाली काढणेबाबत कार्यवाही केली जाते.

आपले सरकार- आपले सरकार पोर्टब वरून प्राप्त झालेली नागरिकाचे तक्रार अर्ज / पत्र त्याबाबत शहानिशा करून स्थळपहाणी करून पुढील कार्यवाही प्रस्तावीत करण्यात येते. तसेच सबंधित कर्मचारी यांचेकडेस पाठपुरावा करून लवकरात लवकर तक्रारी निकाली काढणेबाबत कार्यवाही केली जाते.

PG पोर्टल – PG पोटर्ल वरून प्राप्त झालेली नागरिकांचे तक्रार अर्ज / पत्रे संबंधीत विभागाना कार्यवाही पाठविण्यात येते. संबंधीत विभागाकडून लवकरात लवकर तक्रारी निकाली काढणेबाबत कार्यवाही केली जाते.

लोकअदालत मधील प्रकरणे -संबंधीत वॉर्ड क्लार्क कडुन मालमत्ताधारकांना नोटीस वाटप करण्यात येते सदरची प्रकरणे लोक अदालत मध्ये मनपा विधि याच्या कायदेशिर सल्लानुसार शास्तीच्या रकमेमध्ये १००% सुट देवुन बाकी असलेली रक्कम भरणा करण्यात येते.

प्रभाग समिती क्र.३ कार्यालय क्षेत्रातील अंतर्गत समाविष्ठ मालमत्त कर वसुली विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग जन्म मृत्यु नोंदणी घेणे व जन्म-मृत्यु दाखले घेणे, अनाधिकृत नियंत्रण व निर्मूलन विभाग महाराष्ट्र

महानगरपालिका अधिनियम मधील तरतुदी नुसार सर्व प्रकाचे कामकाज

१. प्रभाग अधिकारी प्रभाग समिती क्र.३ चे कामकाजावर देखरेख व नियंत्रण, २. प्रभाग अभियंता बांधकाम, ३. प्रभाग अभियंता पाणी पुरवठा ४. प्रभाग आरोग्य अधिकारी, ५. कर निरीक्षक वसुली विभाग – मालमता कर वसुली कर्मचारी यांचे कामकाजावर देख रेख नियंत्रण