दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान (DAY-NULM)

विभाग प्रमुखाचे नाव : नानासाहेब सखाराम बेल्हेकर
पदनाम : अभियान व्यवस्थापक
ई – मेल : nana.belhekar23@mah.gov.in
मोबाईल क्रं. : 9822166220

प्रस्‍तावना

कामकाजा संदर्भात प्रस्तावना :

मा. शासनाच्या आदेशान्वये अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान राबविण्यात येते. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान विभागाअंतर्गत मा. शासनाने दिलेल्या विविध घटकाच्या उद्दिष्टाची पुर्तता करणे. खालील घटकांचे काम केले जातात.

1) सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी या घटकामध्ये तीन स्तरावर संघटनात्मक विभागणी करण्यात आलेली आहे.

1) प्रथम स्तर प्रथम स्तर महिला बचत गट मध्ये वस्तीस्तर सामाजिक आर्थिक जनगणेनुसार १० महिलाचा बचत गट तयार करण्यात येतील (सामाजिक आर्थिक जनगणेतील ७० टक्के महिला व उर्वरित ३० टक्क्यात अनुसुचीत जाती, जमाती, महिला, अपंग, अल्पसंख्याक घेतले जातात) बचत गटांचा पंचसुत्री कार्यक्रम राबविले जाते अपंग पुरुषाचा सुध्दा बचत गट करता येऊ शकतो. बचत गटाला तीन महिन्या नंतर खेळते भार्डवल म्हणून फिरता निधी १०,००० रुपये (अक्षरी दहा हजार मात्र) अनुदान स्वरुपात दिला जातो

II) व्दितीय स्तर- व्दितीय स्तरामध्ये प्रत्येकी १०-२० बचत गटातुन प्रत्येकी एक महिला पेडून वस्तीस्तर स्थापन केला जातो. प्रत्येक वस्तीस्तर संघास खेळते भांडवल फिरता निधी रु. ५०,००० (अक्षरी पन्नास हजार रुपये मात्र अनुदान स्वरात दिले जाते.

III) तृतीय स्तर शहरामध्ये सर्व वस्तीस्तर संघातुन एक महिला घेउन त्यांचा एक शहर स्तर संघ तयार करण्यात येते. यासोबत संसाधन संस्था, गरिबांना बँकींग सेवा उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय स्वास्थविमा, सांगड घालण्यात आली आहे. यासुविधा उपलब्ध होण्यासाठी शहरांमध्ये एक शहरी उपजिविका केंद्र उभारण्यात आले आहे.

2) कौशल्य प्रशिक्षणा‌द्वारे रोजगारांची उपलब्धता या घटकामध्ये सामाजिक आर्थिक जनगणनेतील लाभार्थी व अनुसुचीत जाती जमाती, महिला, अल्पसंख्याक व दिव्यांग नागरिकाना कौशल्य प्रशिक्षण देउन त्याना उन्नत रोजगारांची जोड केली जाते.

3) स्वयरोजगार कार्यक्रम या घटकामध्ये वैयक्तीक व बचत गटाना सामुहिक व्यवसाय करण्याकरिता कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून दिले जाते. वैयक्तीक कर्ज योजने मार्फत लाभार्थ्यांना दोन लाख रुपये पर्यंत सामुहिक रित्या व्यवसायासाठी दहा लाखापर्यत चे कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करुन दिला जातो. घेतलेल्या कर्जावर द.सा.द.शे ७ टक्के वरील व्याजदरासाठी अनुदान योजनेकडून देण्यात येते. महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जावर विहीत कालावधीत परत फेड केल्यास त्यांना प्रोत्साहन म्हणून व्याजदरातील रक्कमेत द.सा.द.शे ३ टक्के अतिरिक्त अनुदान देण्यात येते.

4) फेरीवाल्यांना सहाय्य या घटकांमध्ये शहरातील बाजाराच्या आधारावर कौशल्याधा विकास करणे, त्यांच्या उपजिविकेचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जातो. शहरफेरीवाल्याचा आराखडा तयार करुन विकसित करणे, फेरीवाला क्षेत्रातील आवश्यक पायाभूत सुविधाचा विकास करणे, त्याना सामाजिक सुरक्षा देणे, बैंक कर्ज इतर बँकेच्या सुविधा मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.

5) शहरी बेघरांना निवारा निवारा ही मानवांची मुलभुत गरज असल्याने अत्याधिक गरिब व्यक्तीला मुलभुत सुविधा असलेल्या कायम स्वरुपाची निवा-याची व्यवस्था उपलब्ध केली जाईल. निरावाशितांना आश्रय देण्यासाठी एक निवार उपलब्ध करण्यात आला आहे. या निवा-याध्ये किंचन पाणी, शौचालय लाईट मनोरंजन ई. सुविधा उपलब्ध करून दिले आहे.