माझी वसुंधरा
माझी वसुंधरा २.०,३.०,४.० अभियान अंतर्गत महापालिकेची सर्वोत्तम कामगिरी
निर्सगातील पंचतत्वासोबत जीवन पध्दती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचही अस्तित्व राहणार नाही. माझी वसुंधरा याअभियानामध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित विविध उपक्रम महापालिका राबवित आहे. माझी वसुंधरा ३.० अंतर्गत पर्यावरण विभागामार्फत नागरिकांमध्ये पर्यावरण बद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षापासून प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबवित आहेत. महापालिका करत असलेल्या कामची दखल घेत माझी वसुंधरा अभियान ३.० अभियान अंतर्गत ३ लक्ष ते १० लक्ष लोकसंख्येच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरामध्ये अहिल्यानगर महापालिकेला राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला असून रूपये ६ कोटीचा पुरस्कार दिनांक ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित मुंबई येथील एनसीपीएमध्ये झालेल्या ‘माझी वसुंधरा ३.० सन्मान’ सोहळ्यात मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अहिल्यानगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ.पंकज जावळे व उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांना प्रदान करण्यात आला.
शहर सौंदयीकरण व स्वच्छता स्पर्धा
महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदयीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ मध्ये अहिल्यानगर महापालिकेने ड वर्ग महापालिकांच्या गटामध्ये राज्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला. २० एप्रिल रोजी नगर विकास दिनाचे औचित्य साधून एनसीपीए येथे झालेल्या भव्य समारंभामध्ये मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री मा. दीपकजी केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मा. श्री मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव मा. श्री भूषण गगराणी, प्रधान सचिव मा. श्रीमती सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक श्री. किरण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा ५ कोटींचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ऐतिहासिक शहर अशी ओळख असलेल्या अहिल्यानगर महापालिकेच्या शिरपेचात या राज्यस्तरीय यशाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेची तयारी करताना केवळ स्पर्धेपुरता विचार न करता शाश्वत स्वच्छतेची काम करणाऱ्यावर महापालिकेने कायमच भर दिला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपा क्षेत्रात २४१४ वैयक्तिक शौचालय बांधण्यात आली आहेत. शहरांमधील ज्या कुटुंबाकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. जी कुटुंबे उघड्यावर शौचास जात होते, अशा कुटंबांना वैयक्तिक घरगुती शौचालय उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अशाप्रकारे शहरातील प्रत्येक कुटुंबाला शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देऊन अहिल्यानगर शहर हागणदारीमुक्त शहर झाले आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका करत असलेल्या कामाची दखल घेऊन केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धेमध्ये प्रशासक तथा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ड वर्ग महानगरपालिका गटामध्ये राज्य पातळीवर अहिल्यानगर महापालिकेला ३ रा क्रमांक प्राप्त झालेला आहे. तसेच नाशिक विभागामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. याचबरोबर कचरामुक्त शहरांसाठीचे ३ स्टार व हागणदारी मुक्त शहराचा ODF++ दर्जा प्राप्त आहे. महापालिका स्थापनेपासून उत्तोरोत्तर प्रगती करत यावर्षी सर्वोत्तम क्रमांक प्राप्त केला आहे.