
इतिहासप्रसिद्ध अहमदनगरमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत !
पाव शतकांचा इतिहास लाभलेल्या अहमदनगर शहराने निजामशाहीची राजधानी म्हणून मध्ययुगीन काळात आपला दबदबा निर्माण केला. मोगलांचं आक्रमण रोखणाऱ्या रणरामिणी चांदबिबीच्या नावाचा डंका तर त्रिखंडात पिटला गेला. सामाजिक, शैक्षणिक आणि कलेच्या क्षेत्रातही अहमदनगर शहराने अनेक मानदंड निर्माण केले. हा इतिहास जपणाऱ्या काही वास्तू आजही काळाच्या कराल दाढेतून बचावत उभ्या आहेत. त्यांची ही ओझरती ओळख…
अहमदनगरचा भुईकोट किल्ला
नगरचा भुईकोट किल्ला या शहराच्या पाचशे वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. बिदरचा सेनापती जहांगीर खानचा पराभव जिथे केला, त्या जागेती निवड निजामशाहीचा संस्थापक अहमद बादशहाने आपल्या राजधानीसाठी केली. प्रत्यक्ष शहर वसवण्यापूर्वी १४९० मध्ये या जागेवर ‘कोट बाम निजाम’ नावाचा महाल त्याने बांधला. सुरूवातीला किल्ल्याच्या तट मातीचा होता. हुसेन निजामशहाने सन १५६२ या सुमारास सध्या दिसणारी दमडी तटबंदी पोर्तुगीजांच्या मदतीने उभारली. १ मैल ८० यार्ड परिध असलेल्या वा किल्ल्याला २२ बुरूज आहेत. मुख्य प्रवेशद्धार एका मोठ्या बुरुआतच आहे. तटाभोवती विस्तीर्ण खंदक आहे.
सन १८३२ मध्ये किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूस झुलता पूल बांधण्यात आला. किल्ल्यात सोन महाल, ममन महाल, मुल्क आबाद, मीना महाल, रूप महाल, बगदाद महाल, दिलकशाद, मदरसा, पाऊसखाना आदी इमारती व गंगा, जमुना, मछलीबाई, शक्करबाई या विहिरी होत्या. १५०५-९६ आणि १६०० मध्ये मोगलांनी केलेल्या आक्रमणाच्या वेळी चांदबिबीने या किल्ल्याचे संरक्षण केले. तिच्या मृत्यूनंतर किल्ला मोगलांच्या हाती पडला. पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये या किल्ल्यात तुळाजी आंखे, मोरोबादादा, नाना फडणवीस, सदाशिवरावभाऊ पेशव्यांचा तोतया यांना बंदिवान म्हणून ठेवण्यात आले होते. संभाजी राजांची पत्नी येसूबाई, तसेच कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज हेही काही काळ या किल्ल्यात बंदिवासात होते.
(बसस्थानकापासून अंतर २.५ कि.मी.)



राष्ट्रीय नेत्यांचा कक्ष
‘चले जाव’ आंदोलनात पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, नरेंद्र देव आदि बारा राष्ट्रीय नेत्यांना नगरच्या किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते. पंडितजींनी ‘The Discovery of India’ (भारताचा शोध) हा जगप्रसिद्ध ग्रंथ इथेच लिहिला. या नेत्यांना जिथे ठेवण्यात आले होते, तो कक्ष जतन करण्यात आला आहे. पंडित नेहरूंनी वापरलेल्या वस्तू व त्यांच्या हस्तलिखिताच्या छायाप्रती तिथे पहावयास मिळतात. हा किल्ला सध्या लष्कराव्या ताब्यात आहे. इंग्रज सेनापती वेलस्लीने १८०३ मध्ये किला जिंकल्यानंतर न्याहारी घेतलेले ठिकाण खंदकाजवळ आहे. या घटनेची आठवण म्हणून तिथे तोफ ठेवण्यात आली आहे.
बागरोजा
अहमदनगर शहराची स्थापना करणारा अहमद निजामशहा सीना नदीकाठी उभ्या असलेल्या या वास्तूत चिरविश्रांती घेत पहुडला आहे. या पुमटाकृती इमारतीभोवती कोट आहे. पूर्वी या परिसरात उद्यान होते. बादशहा आणि त्याच्या पत्नीची कबर असलेल्या या वास्तुच्या घुमटाच्या आत, तसेव बाहेरच्या भिंतीवर सुंदर नक्षीकाम असून त्यावर कुराणातील वचने कोरण्यात आली आहेत. घुमटाच्या मध्यभागी झरोका असून माध्यान्ही सूर्याची किरणे कबरीवर पडतात, आवारात युन्हाण निजामशहाच्या पदरी असलेला विद्वान वजीर शहा ताहीरवी कबर आहे. बागरोजाजवळच तालिकोटच्या लढाईचे स्मारक आहे. या वास्तूकडे जाण्यासाठी साताळकर रुग्णालयाच्या मामच्या बाजूने पायवाट आहे.
(बसस्थानकापासून अंतर २.५ किमी)


हश्त-बेहश्त बाग
तलावाच्या मध्यभागी असलेली ‘फैजबक्ष महाल’ नावाने ओळखली जाणारी ही अष्टकोनी दुमजली वास्तु १५०६ मध्ये अहमद निजामशहाच्या काळात बांधण्यात आली. या वास्तूचे आठ दरवाजे म्हणजे स्वगचि आठ दरवाजे, असे सांगण्यात येते. या वास्तूजवळ हगामरदाना आहे. पिंपळगाव व शेंडीहून वापरी नळाने येथे पाणी आणण्यात आले होते. हमामखान्यातील हवा आणि प्रकाश व्यवस्था आवर्जून पाहण्यासारखी आहे. पूर्वी या परिसरात गुलाबाचे सुंदर उद्यान होते. अकबरपुत्र मुसद नमस्वर स्वारी करण्यासाठी आला असता येथे वास्तव्यास होता. या परिसरातील लकड महालात मुर्तुझा दिवाणा रहात होता. काही अंतरावर बादगीर (हवा महल) आहे. नगर-मनमाड रस्त्यावरून तसेव पाईपलाईन रोडवरून इथे यायला रस्ता आहे.
(तारकपूर बसस्थानकापासून अंतर ४ कि.मी)
दमडी मशीद
भुईकोट किल्ल्यापासून १ कि. मी. अंतरावर बुन्हाणनगर रस्त्यावर अप्रतिम कॅलिग्राफी असलेली ‘दमडी मशीद’ आहे. सन १५६७ मध्ये निजामशाहच्या पदरी असलेल्या सरदार शेरखानले ही मशीद बांधली. किल्ल्याचे बांधकाम चालू असताना मजुरांनी दिलेली दमडी-दमडी (तेव्हाचे नाणे) साठवून एका फकिराने ही मशीद बांधली, असेही सांगितले जाते. मशीद आकाराने छोटी, तीन कमानींची आहे; पण त्यावरील कोरीव काम अप्रतिम आहे. मिनारांवर व अन्यत्र पूर्ण उमलेली कमलपुष्पे आहेत, मशिदीत्या आत समोरच्या भिंतीत एक कोनाड्यात संगमरवरी दगडावर कुराणातील वचनं वेलबुट्टीसारस्वी कोरण्यात आली आहेत. जमिनीवरील फरशीवी आणि छतातील दगडांची रचना अगदी एकसारखी आहे.
(बसस्थानकापासून अंतर 3.9 कि.मी)


फराहबख्श महाल
निजामशाहीतील वैभवशाली दिवसांच्या आठवणी जपणारी, जगर-सोलापूर रस्त्यावरील ‘फराहबख्श महाल’ म्हणजे अप्रतिम सौंदर्य आणि उत्तम हवेसाठी प्रसिद्ध असलेली वास्तु बुन्हाण निजामशाहच्या पदरी असलेला सस्दार चंगेझखान आणि त्याच्यानंतर सलाबतखान व व्यामतस्वान दख्खनी यांनी हा मुलाबी रंगाचा महाल बांधला. मुर्तुझा निजामशहाच्या काळात १५७८, मध्ये ही वास्तू बांधून पूर्ण झाली. चौरसाकृती विस्तीर्ण तलावाच्या मध्यभागी उम्या असलेल्या या अष्टकोनी दुमजली महालाभोवती पूर्वी सुंदर उद्यान होते. महालाच्या मध्यभागी भव्य रंगमहाल आहे. दुसऱ्या मजल्यावर चिकाच्या पडद्याआड राजघराण्यातील स्त्रियांना बसण्याची सोय करण्यात येत असे. भव्य कमानी व कांरजी है या महालाचे वैशिष्ट्य! याच महालात पेशवे सदाशिवराव, अकबरपुत्र मुराद काही काळ वास्तव्यास होते.
(बसस्थानकापासून अंतर ४ कि.मी)
सलाबतखान मकबरा
नगर शहरात प्रवेश करताना दूर डोंगरावर उभी असलेली ही वास्तु नजरेत भरू लागते. ‘चांदबिबीचा महाल’ या नावाने परिचित असलेली, नगर-पाथर्डी रस्त्यावरील ही वास्तु खरंतर मुर्नुझा निजामजाहवा मंत्री सलाबतखान (दुसरा) याची कबर आहे. समुद्रसपाटीपासून ३०८० फूट उंचीवर, शहा डोंगराच्या पठारावर ही तीन मजली अष्टकोनी दमडी वास्तु बांधण्यात आली आहे. सलाबतस्वान सन १५८९ माये वारला. त्याने आपल्या हयातीतव १५८० मध्ये ही वास्तु बांधली. तळघरात सलाबतखान आणि त्याच्या पत्नीची कबर आहे, तर वास्तुच्या आवारात दुसऱ्या पत्नीची आणि कुत्र्याची कबर आहे. डोंगर उतरणीवर तीन तलाव आहेत. पायथ्याशी वीरभद्र मंदिर आहे. ‘दुर्बिण महाल’ म्हणूनही या महालाचा उल्लेख आढळतो…
(बसस्थानकापासून अंतर १२ किमी)


आलमगीर
इ. स. १६८१ मध्ये दक्षिणेच्या मोहिमेवर निघालेला आलमगीर औरंगजेब बादशहा पुन्हा दिल्लीला परतू शकला नाही. २१ फेब्रुवारी १७०७ रोजी नगर मुक्कामी बादशहाचे वयाच्या ८९ व्या वर्षी प्राणोत्क्रमण झाले. बरोबर १ वर्ष १ महिना बादशहा नगरमध्ये मुकामास होता. ज्या ठिकाणी औरंगजेबाने शेवटचा श्वास घेतला, ते ठिकाण ‘आलमगीर’ म्हणून ओळखले जाते. नगर-पाथर्डी रस्त्यावर, भिंगारपासून थोडे पुढे असलेल्या या स्थळी सध्या मशीद, बारादरी व मदरसा आहे. बारादरीतील संग्रहालयात सुवर्णाक्षरातील कुराणाची दुर्मिळ पत आहे. औरंगजेबाच्या पार्थिवाला जेथे स्नान घातले, तेथे कबर बांधण्यात आली आहे. दफन खुल्ताबाद येथे करण्यात आले.
(बसस्थानकापासून अंतर ६ कि.मी)
डोंगरगण
स्खळाळून वाहणारे ओहोळ, मुक्तपणे विहार करणारी पाखरं, डेरेदार वृक्षांना लगट करत झेपावणाऱ्या राजवेली… अशा वातावरणात एखादा दिवस घालवायचा असेल तर त्यासाठी डोंगरगण है उत्तम ठिकाण आहे. नगरकडून वांबोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिंपळगाव तलावाच्या पुढे असलेले डोंगरगण हे प्राचीन धार्मिक स्थान आहे. वाईच्या शेंडे घराण्यानं जीर्णोद्धार केलेलं इथलं रामेश्वर मंदिर, ‘सीतेची व्हाणी’ म्हणून ओळखली जाणारी गुहा, जवळच असलेल्या मांजरसुभ्याच्या डोंगरावरील मर्दानस्वाना आणि हत्ती मोट पर्यटकांनी आवर्जून पहावी. झाडांच्या गर्द सावलीत बसून इथं वनभोजनाचा आनंद लुटता येतो. चक्रधरस्वामी इथे येऊन गेल्याचा उल्लेख ‘लीळाचरित्रा’त आढळतो.
(बसस्थानकापासूज अंतर १८ कि.मी)


मेहेराबाद
अवतार मेहेरबाबांची समाधी असलेले मेहेराबाद नगर-दौड रस्त्यावर अरणभावजवळ आहे. मेहेरबाबांनी १९२३ मध्ये येथे आश्रम सुरू केला. काही वर्षानंतर मुलांसाठी शाळा व कुष्ठरुग्णांसाठी मोफत दवाखाना सुरू करण्यात आला. १० जुलै १९२५ पासून बाबांनी मौनव्रत धारण केले. ही मौजावस्था महासमाधीपर्यंत टिकली. ३१ जानेवारी १९६९ रोजी मेहेरवायांनी देहत्याग केला. समाधीजवळच बाबांची कुटी व संग्रहालय आहे. त्यांच्या वस्तु, वर्णमाला फलक, कपडे, छायाचित्रे, सायकल या संग्रहालयात पहावता मिळतात. मेहेरबाबांची जयंती (२५ फेब्रुवारी) व पुण्यतिथी (३१ जानेवारी) है उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. पिंपळगाव माळवी जवळील मेहेशझाद येथील टेकडी विशेष पवित्र मानली जाते.
(बसस्थानकापासून अंतर ६ कि.मी)
ह्यूम मेमोरिअल चर्च
अहमदनगर शहराच्या ५०० वर्षांच्या जडण-घडणीत विविध धर्माचा मोलाचा वाटा आहे. ‘महाराष्ट्रातील येरूसलेम’ म्हणून नगरचा नावलौकिक आहे. इ.स. १८३१ मध्ये नगरला मराठी मिशनचे कार्य सुरू झाले. डॉ. ग्रॅहम, स्कॉटिश मिशनचे जॉन विल्सन, स्टिव्हन्सन, मिचेल, ग्रीव्हज है मगरला आलेले प्रारंभीचे मिशनरी. अहमदनगर पहिली मंडळीची (कॉडि) दोन प्रार्थना मंदिरे नगरमध्ये आहेत. जुने मंदिर इ.स. १८३७ मध्ये बांधण्यात आले. विस्तगल्लीतील धूम मेमोरिअल चर्च १९०२ ते १९०६ या काळात बांधण्यात आले. ही इमारत दमडी असून वरच्या बाजूला मनोऱ्याएवजी घुमट आहे. घुमटाशेजारी मोठी पितळी घंटा आहे. भव्यपणा आणि ठिकठिकाणी | रेखाटलेली कमळाची फुले हे या वास्तूचे वैशिष्ट्य. या चर्चमध्ये १३०० भाविक बसू शकतात.
(बसस्थानकापासून अंतर २ कि.मी)


आनंदधाम
अहमदनगर जिल्ह्याला लाभलेली संतपरंपरा समृद्ध करणारे राष्ट्रसंत जैन आचार्य आनंदऋषीजी महाराज यांचे वास्तव्य धार्मिक परीक्षा बोर्जत होते. पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथे जन्मलेल्या आनंदकपीली वयाच्या १३ व्या वर्षी मिरी येथे जैन संप्रदायाची दीक्षा घेतली. २८ मार्च १११२ रोजी आचायर्याचे नगर येथे महानिर्वाण झाले, त्यांच्यावर अंतिम संस्कार जेथे करण्यात आले, त्या जागेवर ‘आनंदधाम’ उभे आहे. कमळाचा आकार असलेल्या या वास्तूच्या मध्यभागी आनंदऋषीजींचा अस्थिकलश ठेवण्यात आला आहे. सर्वधर्मियांच्या दृष्टीने हे पवित्र स्थळ बनले आहे. या स्मारकामागे धार्मिक परीक्षा बोर्ड व आचार्य निवास आहे. आनंदकर्षदि आसन व त्यांनी वापरलेल्या वस्तू तेथे आहेत. धार्मिक परीक्षा बोडांतील ग्रंथालयात अनेक दुर्मिळ ग्रंथ आहेत. (बसस्थानकापासून अंतर १ कि.मी)
रणगाडा संग्रहालय
अहमदनगर-सोलापूर रस्त्यावरील फराहबख्श महालाजवळ असलेते आर्मर्ड कोअर सेंटर अॅण्ड स्कूलने उभारलेले रणगाडा संग्रहालय हे देशाचे भूषण आहे. या संग्रहालयात भारतासह इंग्लंड, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, फ्रान्स आदी देशांनी विविध युद्धांत वापरलेले ४० हून अधिक रणभाडे ठेवण्यात आले आहेत. जमिनीत पुरलेले सुरुंग नष्ट करणारे, रस्त्यातले अडथळे दूर करून सैन्याचा मार्ग मोकळा करणारे, पाण्यात तरंगणारे असे विविध प्रकारचे रणमाडे इथे आहेत. स्वयास्तुऱ्या रणगाड्यांबरोबर त्यांच्या प्रतिकृती. छायाचित्रांचे तसेच लष्करी ध्वजांचे कायमस्वरुपी प्रदर्शन या संग्रहालयात आहे. पाक युद्धात भारतीय सैन्याने नामोहरम केलेला ‘पेंटन’ स्णगाडा इवें आहे.
(बसस्थानकापासून अंतर ४ कि.मी)


एफर्टस् तारांगण
ग्रामीण भागातील जगातील पहिले अत्याधुनिक डिजिटल तारांगण (प्लॅनेटोरियम) नगर शहरापासून १२ कि. मी. अंतरावर औरंगाबाद रस्त्यावरील धनमस्वाडीजवळ उभारण्यात आले आहे. आकाशातील ग्रह, तारे, तारकासमूह याचबरोबर विविध अवकाश मोहिमांची मनोरंजक व वित्तथरारक माहिती असलेले मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील शो इथे दाखवले जातात, आठवड्यातून कोणत्याही दिवशी तुम्ही या तारांगणात्ला भेट देऊ शकता. या परिसरात नक्षत्र उद्यान आणि विज्ञानावर आधारीत स्वेळणी असलेला पार्कही उभारण्यात आला आहे. सहलींसाठी जेवण व राहण्याची व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे. रात्री आकाश दर्शन आयोजित केले जाते. संपर्क: श्री. अशोक जोगदे, मो. ९८२२०९५६९१. फोन – (०२४१) २४२४१०३.
नगर परिसरात पाहण्यासारखे आणखी काही…
* माळीवाड्यातील विशाल गणपती मंदिर शाहशरीफ दर्मा केडगावची रेणुकामाता * बुऱ्हाणनमस्वी देवी महावीर कला दालनातील ‘सारे जहाँ से अच्छा’ पेन्सिल चित्र बारा इमाम कोटला * दो बोटी चिरा कापड बाजारातील जैन मंदिर चित्रकार प्रमोद कांबळे व चित्रकार अनुराधा ठाकूर यांची कलादालने गोरक्षनाथ गड * अकोळनेर आमडगाव.
नगर जिल्ह्यातील महत्त्वाची स्थळे :
नेवाशाचे ज्ञानेश्वर मंदिर जामखेड येथील ग्रामीण रेहेकुरी अभयारण्य * साईबाबांची शिडी सिद्धीविनायकावे सिद्धटेक शनिशिंगणापूर देवगड मोहटा देवी वृद्धेश्वर राळेगणसिद्धी आरोग्य प्रकल्प * सहुरी येशील महात्मा फुले कृषी विद्यापिठ भंडारदरा धरण कळसुबाई हरिश्चंद्र गड रतनगड पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे जन्मस्थळ चौंडी निघोजचे रांजणखळगे * ढोकेश्वर लेणे * भगवानगड पेडगाव व स्वर्गाचा किल्ला.


ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय
अहमदनगर जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जपणारे वस्तुसंग्रहालय (स्थापना १ मे १९६०) महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या या टुमदार वास्तूत ५० हजारांहून अधिक दुर्मिक दस्तऐवज, १५ हजार ग्रंथ, पोथ्या, ताम्रपट, शस्त्रे, हजारावर जुनी नाणी, मूर्ती आदींचा संग्रह आहे. जोर्वे, नेवासे व दायमाबाद येथील उत्खननामधील वस्तू; मराठीतील आद्य ग्रंथ ज्योतिषरत्नमालेची सर्वात प्राचीन प्रतः २०० फूट लांबीची जन्मपत्रिका; शिळा प्रेस, मोहरीऐवढ्या मण्यावर ‘रामपंचायतन वे चित्र कोरलेली अंगठी, लघुचित्रे; चेन नसलेली सायकल, उलटसुलट वाचता येणारे रामकृष्ण काव्य, तसेच विविध प्रकारचे गणपती या संग्रहालयामध्ये आहेत. गुरुवार वगळता रोज सकाळी १० ते ५ या वेळात संग्रहालय खुले असते.
(बसस्थानकापासून अंतर २ कि.मी)
नगरला कसे याल…
अहमदनगर हे पुण्यापासून १२० कि.मी., औरंगाबादपासून ११० कि. मी., मुंबईपासून २८४ कि.मी. तर शिडींपासून ८५ कि.मी. अंतरावर आहे. बस, रेल्वेची उत्तम सुविधा येथे आहे. जवळचे विमानतळ पुणे व औरंगाबाद. लवकरच शिर्डीजवळ काकडी येथे विमानतळ होत आहे.
वर्षभरात कधीही नगरला भेट देता येते. तथापि, ऑगस्ट ते फेब्रुवारी हा पर्यटकांसाठी उत्तम कालावधी असतो. नगरचा कापड बाजार, भांडी बाजार व सराफ बाजार प्रसिद्ध आहे. नगरची मिसळ, जिलेबी, स्ववा व चिवडा तुम्हाला नक्की आवडेल.

अहिल्यानगर ऐतिहासिक स्थळे